मूळ गीत धाकटी बहीण चित्रपटातील आहे. रचनाकार जगदीशजी खेबूडकर यांची माफी मागून विडंबन रचना सादर करत आहे.
धुंदी दारूड्यांना
••••••••••••••••••
स्वैररूप आले शिव्या नी शापांना
तुझ्या जीवनी जेव्हा आली मदिरा
रंग चढला गप्पांनाही गहिरा
दारूसोबतच लागतो चखणा
मद्याचा घोट की घोट अमृताचा
मित्रांपुढे हट्ट दारू ढोसण्याचा
पिऊनी तर्र झालास तू उताणा
शपथ तुझी आमरण पिण्याची
सोड्यासोबतीनेच दारू घेण्याची
निमंत्रण पिण्याचे देतो दोस्तांना
No comments:
Post a Comment