Thursday, June 6, 2019

गावातील सकाळ... Morning of Village... Marathi Poem... Marathi Kavita... मराठी कविता...


कोंबड्याची बांग । ऐकुनी उठती ।
प्रभूला स्मरती । गावकरी ॥१॥
 

करून प्रार्थना । सूर्याचे दर्शन ।
देवाचे पूजन । मनोभावे ॥२॥
 

पहाट प्रभाते । सड्याचे शिंपण ।
मातीचे लिंपण । दिनक्रम ॥३॥
 

दिन झाला सुरू । निघे शेतकरी ।
घेवुनी भाकरी । शिवारात ॥४॥
 

शोध तू माणसा । तुझ्या अंतरात ।
नसे मंदिरात । भगवंत ॥५॥
 

'ग्रामगीता' सांगे । जीवनाचा सार ।
माणसा उद्धार । अखंडित ॥६॥
 

'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी ।
आयुष्याची खाणी । ग्रामगीता ॥७॥
 

करावा विकास । उद्धारुनी गाव ।
कमवावे नाव । जगामध्ये ॥८॥
 

सुंदर गावाला । 'उमा'चे वंदन । 
जसे ते चंदन । सुगंधित ॥९॥
 
 
 
 

No comments:

Post a Comment