बुद्धिमत्तेने खणखणीत वाजावे नाणे
ऐका ऐका हो, माणसाचे जीवनगाणे... ॥धृ॥
माता-पिता कुटुंबाचा आधार
नाही त्यांच्याशिवाय संसार
सुखी ठेव आई-बापाला गड्या
कर तू, त्यांचे स्वप्न साकार... ॥१॥
रुतला जर तुझ्या पायी काटा
लगेच तू बदलू नकोस रे वाटा
कधी-कधी वाट्याला येते दुःख
कधी आनंदाच्या येतात लाटा... ॥२॥
स्त्री-पुरूष आहेत एकसमान
याचे राहू द्यावेस नेहमी भान
आई, ताई, पत्नी आणि मुलगी
यांना द्यावास सारखाच मान... ॥३॥
होईल तुझेही जीवन विशाल
असे जगावेस गड्या तू खुशाल
गाऊनी सुखाचे हे जीवनगाणे
बनावेस धगधगणारी मशाल... ॥४॥
No comments:
Post a Comment