आला पाऊस अंगणी
मन बहरले सारे
काळ्या-काळ्या ढगांतून
किती हसतात वारे
कसा घालतो धिंगाणा
टपटप छपराला
कसा वाजे दणादणा
बरसती मृगधारा
येते तुझी आठवण
आहे कोरली मनात
छान प्रीत साठवण
जेव्हा येतसे पाऊस
हर्ष होई धरतीला
कडाकडा नाचणारी
वीज त्याच्या दिमतीला
शालू नेसून हिरवा
झाली धरणी नवरी
तिचा सखा, प्रियकर
येतो पाऊस भूवरी
No comments:
Post a Comment