पौर्णिमा आली
चंद्रासवे चांदणी
प्रेमात न्हाली
चांदणचुरा
पसरे सभोवार
नभ चुकार
चंद्राला साथ
नभात चांदण्यांची
हातात हात
पौर्णिमा छान
कोजागिरीची आली
विसरू भान
नाचूया सारे
एकदिलाने आज
गातील वारे
दूध केशरी
प्रतिबिंब चंद्राचे
दिसे अंबरी
कोजागिरीची
सुंदर रात्र आज
चंद्राचा साज
मिठीत तुझ्या
आज साजणा आले
तुझीच झाले
तू माझा चंद्र
मी तुझीच चांदणी
मनी गोंदणी
प्रेमाची वर्षा
होतसे आकाशात
रंगू प्रेमात
आज अंबरी
होत आहे साजरी
ती कोजागिरी
No comments:
Post a Comment