Tuesday, May 28, 2019

पेरणी... Farming... Marathi Kavita... Marathi Poem...मराठी कविता

 
 
 

 
केली पेरणी पेरणी
काळ्या शेतामध्ये छान
पंढरीच्या विठूराया
द्यावे पावसाचे दान..... ॥१॥
 

माझे ढवळ्या-पवळ्या
संगे चिमणी-पाखरं
गाणे गातात मस्तीने
सारी माझीच लेकरं..... ॥२॥
 

काळ्या-काळ्या ढेकळांना
लागे पावसाची आस
तरी कोसळेना नभ
फक्त होतसे आभास..... ॥३॥
 

यावे वरूणाने आता
बीज सुकायच्याआधी
द्यावे भरपूर पाणी
कोंब अंकुरण्याआधी..... ॥४॥
 

शेतामध्ये पसरला
सारा कष्टाचाच घाम
अवंदाच्या वर्षी तरी
मिळो मनाजोगा दाम..... ॥५॥
 

कष्ट करून जोमाने
पुन्हा फुलावे शिवार
काळ्या आईच्या कुशीत
सारे भिजावे आवार..... ॥६॥
 

यावा मृग लवकर
जावी मोहोरून शेती
याव्या पावसाच्या धारा
ओली व्हावी काळी माती..... ॥७॥
 
 
 
 

Mirror... English Poem... English Kavita... दर्पण... आरसा... आईना...





A Mirror is part of our life...
Our reflation in the mirror tells us many things...


How we look,
our body language,
our nature, etc...


A Mirror is trying to share his opinion with us, but we can't understand his feelings...


A Mirror is very lonely like us...
No one can understand his feelings...



गुलाबी लहर... Hindi Kavita... Hindi Poem... हिंदी कविता...


बहती हवा मुझे भीं, जरासी खबर दे दो
इकबार हीं सही वो, गुलाबी लहर दे दो
 

वो तोड कर चले हैं, मेरा दिल भी, सपने भीं
जीना नहीं हैं मुझको, ऐ यारों जहर दे दो
 

वैसे तो ग़म भुलाना, ये मकसद मेरा भीं हैं
ऐ प्याले, ना पिते भी, पिने का असर दे दो
 

आती नहीं ये नींद, मैं जगती हूं रातभर
खुशनुमां लगे जो खुशी का पहर दे दो
 

मैं आस में उन्हीं की, यहां बैठीं हूं चलो
रातों में, दिन में सिर्फ, पिया की नजर दे दो
 
 
 
 
 
 
 
 

स्वप्न... Dream... Marathi Kavita... Marathi Poem... मराठी कविता...




नव्या संसारात
नवे स्वप्न रंगवताना
लग्न निभवताना
गंधाळावे..... <१>

जोडीदाराची मिठी
आवडीचा प्रेमळ सहवास
वाटतो खास
हृदयस्पर्शी..... <२>

आत्म्याचे समर्पण
दरवळे मोगऱ्याचा सुगंध
रेशमाचा बंध
नाजूकसा..... <३>

स्वप्न रंगवताना
ठेवावे वास्तवाचे भान
सगळ्यांना मान
देऊयात..... <४>

गावे आनंदाने
राजा - राणीचे गाणे
प्रीतीचे तराणे
मनाजोगते..... <५>




Wednesday, May 22, 2019

Books... English Poem... English Kavita... पुस्तके...








Books useful for gaining knowledge...
All types of books are helpful...


Don't tear them...
Some kids tear the Books, give proper guidance to them...


Magazines
Epics
Storybooks
Textbooks
Anthology
E-books 


are the type of books...
Please use each and every type of book carefully...




लुभावना रूप... Beautiful face... Hindi Kavita... Hindi Poem... हिंदी कविता...



अब सीने में वो आग नहीं हैं
कपडों में वो झाग नहीं हैं

जिस घर में माँ-बाप नहीं हैं
वहां काशी-प्रयाग नहीं हैं

चांद से भी रूप लुभावना हैं तेरा
तुझ पर कोई भीं दाग नहीं हैं

कितनी बार करते हो तुम गलतियाँ 
लगता हैं तुमको दिमाग नहीं हैं

हैं वो आदमी बेपरवाह थोडा
पर ज़हरीला नाग नहीं हैं

अनामिक नाते... Unknokn relationship... Marathi Poem... Marathi Kavita... मराठी कविता...


तुझे माझ्यावर प्रेम असूनही
मला ते कधी नाही जाणवले
मला दूर गेलेलं बघितल्यावर
तुझे डोळे लगेच पाणावले..... ॥१॥
 

पत्ता-बित्ता तुझा काय आहे 
हे मला नव्हते काही ठावूक
मी रडायची तेव्हा मात्र
तू ही व्हायचास भावूक..... ॥२॥
 

असे कितीतरी क्षण राया
यायचे आणि फक्त जायचे
का माझे मन तुझ्याकडे
कधीही मात्र नाही न्यायचे..... ॥३॥
 

एकदा हिंमत करून तू सांगितली,
तुझ्या मनातील माझ्याबद्दल प्रीती
मला मात्र वागावे लागले, प्रियकरा
नेहमीच सांभाळून ही जनरीती..... ॥४॥
 

माझे लग्न झाले असूनही
मी तुझ्यावर प्रेम कसे करणार ?
माझ्या जोडीदाराचा हात सोडून
तुझा हात कसा धरणार ?..... ॥५॥
 

तुला सत्य सांगिल्यावरही
ते कधीच नाही पटले
त्यानंतर आपल्या नात्याबद्दल
मलाच खूप वाईट वाटले..... ॥६॥
 

हे माझ्या अनामिक प्रियकरा,
ही एक कविता तुझ्यासाठी
तुझ्या-माझ्यातल्या सुंदर, गोड
हळव्या प्रेमाच्या नात्यासाठी..... ॥७॥