Friday, July 24, 2020

जागतिकीकरण... मराठी कविता... Globalization... marathi poem...




जागतिकीकरणामुळे आपण 
गेलो जगाच्या अधिक जवळ
माणूस माणसापासून पण इथे 
दुरावत चाललाय...

हे लक्षातही आले नाही आपल्या 
आपण मग्न आहोत 
स्वतःच्याच विश्वात
गुरफटलो आहोत
जागतिकीकरणाच्या विळख्यात

आपण निर्माण केलाय 
एक कोष आपल्याच भोवती...
ज्यातून आपण बाहेरच येत नाही
झालंय जागितकीकरण या जगात...
त्या जगातही झालं असेलच 
जागतिकीकरण

खरंतर, जागतिकीकरण व्हायला हवं
तुझ्या आणि माझ्या बुद्धीत...
आपल्या सर्वांच्या बुद्धीत

तुटून जायला हवीत सगळी बंधने
कुठेतरी काहीतरी जोडलं जायला हवं.
बुद्धीला माणूसकीची जोड 
द्यायलाच हवी...

जागतिकीकरण आपल्या सर्वांच्या बुद्धीतही
व्हायला हवं ना...


Friday, June 19, 2020

आजी... मराठी कविता... grandmother... granny... marathi poem... marathi kavita...



आजी


आजी झाली बाप । आजी झाली माय । 
आणि सांगू काय । मी अनाथ ॥१॥

सांगुनीया गोष्ट । ती घेते बाहूत ।
आजी देवदूत । माझ्यासाठी ॥२॥

देते मला आजी । धडा जगण्याचा ।
लढा संकटाचा । शिकविते ॥३॥

राहावे नेहमी । आजीच्या छायेत । 
तिच्याच मायेत । कृतार्थाने ॥४॥

'उमा'च्या आजीला । सुखी ठेव देवा ।
करते मी सेवा । अहोरात्र ॥५॥


Sunday, May 10, 2020

भूत... मराठी कविता... bhoot... ghost... marathi kavita.... marathi poem





एक अक्राळविक्राळ आकृती
दोन्ही पायांनी उलटी
काय होईल माझे ?
जर झाली ती सुलटी

अस्ताव्यस्त पिंजारलेले केस
भयग्रस्त काळे रूप
माझ्यासमोर आले अचानक
घाबरगुंडी उडाली खूप

कुठे पळू ? कोणत्या दिशेने ?
वाटते अनामिक भीती
खोलीत एकटीच आहे मी
हलतांना दिसती भिंती

पांढरी साडी, काळेकुट्ट अंग
हातात धरून मेणबत्ती
सरकता ती जराशी पुढे
झाली माझी गुल बत्ती

माझ्याकडे बघितले तिने
घाणेरड्या लालभडक नेत्रांनी
अंग-अंग हादरली मी
माझ्या सर्वच गात्रांनी

हाताच्या नसा हिरव्या
दात, सुळे किळसवाणे
रक्त माखलेले अंगावर
माझ्या गात होती रडगाणे

भीतीने उडाले माझे होश
तोंडातून शब्द निघेना
विरून गेली ती आकृती
तरी अनामिक भीती जाईना

Thursday, March 12, 2020

कविता म्हणजे... मराठी कविता... Marathi poem... Marathi Kavita...







माझी कविता म्हणजे काय ?
मनातल्या शब्दांचे गुंफण
हृदयी कायमच्या कोरलेल्या
भावनांचे नाजूक कोंदण..... [१]

कधी शांत, संयमित, मृदू
कधी कविता असते निखारा
ज्वलंत, धगधगणारा, अंगार
विद्रोही कवितेमुळे येतो शहारा..... [२]

सुगंधासाठी काही मिसळले शब्द
तरलतेने ओवला शब्दांचा हार
आनंदी असेल मी जर का,
कविता असते सुखाची धार..... [३]

मनातली भावना उतरते कागदावर
तेव्हाच तर कविता बनत जाते
आपल्या आयुष्यातील क्षणांचा
ती मग अलगदतेने मागोवा घेते..... [४]

जीवनात जेव्हा प्रेम असते
तेव्हा नाजूक प्रेमाचे चित्रण
चिंध्या झाल्यावर मनाच्या मात्र
ओरबाडलेल्या हृदयाचे कात्रण..... [५]

भिडावी रसिकापर्यंत कविता
मग कवितेने घालावा दंगा
नित्य झरावी लेखणीतून
ही कवितेची अविरत गंगा..... [६]

Sunday, March 8, 2020

होळी... रंगपंचमी... मराठी कविता... Holi... Rangpanchami... marathi kavita... marathi poem...




स्पर्धेसाठी कविता

विषय - होळी

आज होळीत मित्रांनो
चला जाळूया सारे दोष
राहूया नेहमी प्रेमाने
मनी असू देऊ संतोष

आजच्या दिवशी होळीला
दाखवू नैवैद्य पुरणाचा
सत्मार्गावर चालूया नेहमी
हाच मार्ग ठेवू जगण्याचा

करूया पूजा होळीची
मनातले मिटावेत पाप
शांत व्हावे मन साऱ्यांचे
मनात नको यावा संताप

राहूया, बोलूया प्रेमाने
मिटवू भांडणे सारी
मांगल्याचे, विश्वासाचे
लावूया तोरण दारी

रंग टाकू एकमेकांवर
विसरू सारे द्वेष
प्रेम देऊ, प्रेम घेऊ
संपवून टाकू सारे क्लेष




Wednesday, February 26, 2020

गौरव मराठीचा... मराठी कविता... Marathi poem...





माझ्या मराठी भाषेचा

आहे मला अभिमान
चला गाऊयात सारे
मराठीचे गुणगान... <१>

चौदाखडी पाटीवर
कौतुकाने लिहूयात
गोड आपल्या वाणीने
मराठीत बोलूयात... <२>

परकीय शब्दसुद्धा
उरी सामावून घेते
तिच्यातले प्रेम सारे
पूर्ण जगताला देते... <३>

वृत्ते, कविता, गझल
मराठीचे अलंकार
मात्रा, उकार, वेलांटी
हाच भाषेचा श्रृंगार... <४>

मराठीचा हा गोडवा
सदा अमर रहावा
गोड भाषेचा सन्मान 
सर्व लोकांनी करावा... <५>

अशी मधाळ मराठी
शोभे कशी राजभाषा
सदा रहावी, टिकावी
एवढीच एक आशा... <६> 

मरेपर्यंत... मराठी कविता... Till death... Marathi Kavita... Marathi Poem...




काय करावे हे अनेकांना कळते
पण काय करू नये हे सांगणारे
कोणीच नसतं...

त्यावेळी आतल्या आत घुसमटत जातो माणूस...
लपवून घेतो स्वतःला एकांताच्या कोनाड्यात...

चालतो राहतो वाट संपेपर्यंत...
जगत राहतो मरेपर्यंत...

Wednesday, January 15, 2020

Hate... English Poem... English Kavita... द्वेष... तिरस्कार...





I never hate you, never neglect you...
But, I get hate and ignorance from you each and everytime...

I am not fool...
That I am not understand your feelings about me...
One thing, keep in mind that I am not your enemy...

I am your friend...
So, behave well with me...

नज़ाकत... हिंदी कविता... Hindi Poem... Hindi Kavita...




नज़ाकत देखकर
हम मर मिटे हैं
तुमपर
करते है जान
निसार तुमपर...

काम नहीं हैं
तुम्हारे सिवा
और कोई...

लग गयीं हैं
लत तुम्हारी
हो गयीं हैं
जैसे कोई
मुझे बीमारी

पायरी... मराठी गझल... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Poem... Marathi Gazal..







आहे जर का चालायाचे एकटीने
कशास घेऊ कुणास माझ्या सोबतीने
 
कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही
काम आजचे होते नुसत्या ओळखीने

मी नात्यांना प्रेमामध्ये गुंफलेले
साखळीस मी जोडत गेले साखळीने

हिंमत नाही हारायाची अपयशाने
पुढे जायचे मला पायरी पायरीने

एकदा 'उमा' विचार कर तू शांततेने
ध्येय तुझे तू गाठशील का धांदलीने 

Wednesday, January 8, 2020

Equal... English Poem... English Kavita... समान...




The only difference between you and me is the gender difference...
But, our souls are same...

Not two souls...
We have only and only one soul...
Hence, we are equal...

Not two different personslities but only one personality...

प्यार... प्रेम... Love... हिंदी कविता... Hindi Poem...




बंद करूं आंखें
तो तुम दिखते हो...
खुली आंखों से
तुम सपनों में सजते हो...

अधुरी हैं जिंदगी
मेरी तुम्हारे सिवा
नहीं मेरा वजूद कोई
इक जीने के सिवा...

पुकारती हूं तूम्हें
चले आओ तुम
मैं और तुम
बन जाये हम...

मुलगी... मराठी कविता... Marathi Poem... Daughter... बेटी...




दोन कुटुंबांना जोडते मायेने
थोरा-मोठ्यांचा ठेवते ती मान
मुलगी म्हणजे खाण गुणांची
माहेरासाठी लेक आहे वरदान

काय वर्णावी कन्येची महती
मुलगी म्हणजे फुलांचा सुवास
मुलगा आहे दिवा घराचा तर
लेक आईबापाचा आहे श्वास

Wednesday, January 1, 2020

Senior citizen... English poem... English Kavita...






Senior citizens are not burden to society...
They are valuable for us...

Please take take to every senior citizen...
Take care to every person in new year...

Happy new year...

नया साल... हिंदी कविता... नवे वर्ष... Happy new year... Hindi poem... Hindi Kavita...





तुम्हें पाने के लिऐ
मैंने छोड़ दी ये दुनिया
फिक्र नहीं हैं
रिश्तों की...
इस नए साल का
स्वागत साथ में करेंगे...
आनेवाला नया वर्ष
सबको खुश रखें...

ऑफबीट अर्थात अरसिक... marathi kavita... marathi poem... मराठी कविता... Offbeat...




*ऑफबीट - अर्थात अरसिक*
••••••••••••••••••••••••••••••••


जीवनी मोगरा गंधाळला नाही
कोणत्या फुलाचा सुवास दरवळला नाही

तू होतास तेव्हा मी सजत होते
तू गेल्यानंतर मी गजरा माळला नाही

रिक्त होत गेले मी ओंजळी-ओंजळीने
पुन्हा प्रेमझरा पाझरला नाही

तुझ्या हातात हात गुंफायची मजा वेगळी होती
मी अताशा कोणाचा हात पकडला नाही

रसिकता होती माझ्यात भरलेली
आता ती रसिकता राहिली नाही

मित्र-मैत्रिणी होते भरपूर मला
एकटी खोलीत आता बसते मी

मी बीटवर नाचायचे फार पूर्वी
आता कायमची ऑफबीट झाले मी