Monday, April 8, 2019

शराब... Marathi Kavita... Marathi Poem... मराठी कविता... Sharab... Liquor...


दिसताच तू
श्वासात भरतो तुला
मोहोवतेस मला
सुगंधाने...
 

मी मजनू,
तूच माझी लैला
दिल झाला
खल्लास...
 

झालो घायाळ 
तुझी वेगवेगळी रूपे
हृदयावर छापे
निशाणी...
 

दिवस-रात्र
तुझी चढली नशा
जगू कसा
तुझ्याविना...
 

तुझे वेड
म्हणतात, वाईट असते 
भल्याभल्यांना मारते
मोहामुळे...
 

उतरावी कशी
तुझी माझ्यावरची धुंदी
नशीबात मंदी
कायमचीच...
 

अपूर्णच मी
तुझ्याशिवाय आधा-अधुरा
माझी मदिरा
शराब...
 
 
 

No comments:

Post a Comment