Saturday, June 15, 2019

पहिले प्रेम... First love... Marathi Kavita... Marathi Poem... मराठी कविता...


पहिले प्रेम ते
जीवनात आले
तेव्हाच काळीज
खल्लास हे झाले... <१>
 

होते मी एकटी
रिक्तशी घागर
प्रेमाचा भरला
तुझ्यात सागर... <२>
 

माझ्या मनामध्ये
तूच भरलेला
प्रत्येकच क्षण
मनी साठलेला... <३>
 

हे पहिले प्रेम
आहे खूप खास
राजसा तूच रे
जगण्याचा ध्यास... <४>
 

वचन दे मला
एकत्रच राहू
सुंदर हे जग
सोबतीने पाहू... <५>
 

विसरूच नये
पहिल्या प्रेमाला
आनंद मनाचा
सांगावा जगाला... <६>
 
 
 

Thursday, June 6, 2019

गावातील सकाळ... Morning of Village... Marathi Poem... Marathi Kavita... मराठी कविता...


कोंबड्याची बांग । ऐकुनी उठती ।
प्रभूला स्मरती । गावकरी ॥१॥
 

करून प्रार्थना । सूर्याचे दर्शन ।
देवाचे पूजन । मनोभावे ॥२॥
 

पहाट प्रभाते । सड्याचे शिंपण ।
मातीचे लिंपण । दिनक्रम ॥३॥
 

दिन झाला सुरू । निघे शेतकरी ।
घेवुनी भाकरी । शिवारात ॥४॥
 

शोध तू माणसा । तुझ्या अंतरात ।
नसे मंदिरात । भगवंत ॥५॥
 

'ग्रामगीता' सांगे । जीवनाचा सार ।
माणसा उद्धार । अखंडित ॥६॥
 

'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी ।
आयुष्याची खाणी । ग्रामगीता ॥७॥
 

करावा विकास । उद्धारुनी गाव ।
कमवावे नाव । जगामध्ये ॥८॥
 

सुंदर गावाला । 'उमा'चे वंदन । 
जसे ते चंदन । सुगंधित ॥९॥
 
 
 
 

Tuesday, June 4, 2019

नजराणा चुंबनाचा... Gift of Kisses... Marathi Kavita... Marathi Poem... मराठी कविता...




प्रेम माझे राजसा आहे तुझ्यावर
आपल्या प्रेमास नाही रे पुरावा
का अचानक दूर तू गेलास आता ?
येवुनी जवळी सख्या संपव दुरावा... {१}



भेट व्हावी आपली सुंदर, मनोहर
भेटण्या तू ये नशील्या चांदराती
देवुनी मज ठेव पत्ता भेटण्याचा
तू सख्या घ्यावेस माझे हात हाती... {२}



लाल मी नेसून साडी येतसे रे
मोगऱ्याचा माळुनी वेणीत गजरा
होतसे धडधड उरामध्ये जराशी
चालतांना भासतो तो गोड नखरा... {३}



पाहता मी रूप मोहक, राजबिंडे
हर्ष झाला खूप माझ्या या मनाला
तू पुन्हा द्यावीस कबुली रे प्रितीची
घाबरावे का असे स्वार्थी जनाला... {४}



स्पर्श होता राजसाचा मज शहारा
वाढला मग वेग माझ्या स्पंदनाचा
घेवुनी दे ना मिठीमध्ये सख्या रे
छान नजराणा मला तू चुंबनाचा... {५} 





दूर जाताना... Marathi Kavita... Marathi Poem...

 
 
 
 
 
 
 
मला कधी जायचे नव्हते
 
तुला सोडून दूर जाताना
 
तरीही वाईट वाटलेले
 
दूर मी गेले तुझ्यापासून
 
नयन माझेही दाटलेले
 
 
 

Rain... English Poem... English Kavita... पाऊस...








Rain rain 
Come to the soil...
When a drop of rain touches to soil the fragrance is amazing...
Please, rain comes fast...


We need you...
Farmers, children, all people are waiting for you...
Rain, please stop the suicide of farmers...
Spread greenery everywhere...


Rain rain
come to the soil...






मुझको भाँता हैं... Hindi Kavita... Hindi Poem... Favourite... हिंदी कविता...

 
 
साफ-सुथरा शुभ्र सा, लिबास मुझको भाँता हैं
राहे होगी सब सरल, प्रयास मुझको भाँता हैं
 

चांदनी ये रात हैं, रहो ना तुम करीब ही
यूं हमेशा साथ दो, तू पास मुझको भाँता हैं
 

माँ, खुशी का पल मुझे, तू साथ देती जब मेरा
तब लुभावना सा एहसास मुझको भाँता हैं
 

दोस्त वो चला गया, मैं भी हुई अकेली तब
कोई संगी ना ये मन उदास मुझको भाँता हैं
 

ये जो एहसास हैं, तेरा सभीं ही कोनों में
ऐ खुदा रहे तू आसपास मुझको भाँता हैं
 
 

ये रे ये रे पावसा... Rain... Marathi Poem... Marathi Kavita... मराठी कविता...

ये रे ये रे पावसा आता
रिमझिम वाहू दे धारा
वीज चमकावी लख्ख
छळावा नटखट वारा.......॥१॥

थेंब बरसू दा टपोरे
तेव्हा भागेल तहान
मोहोरेल सारी सृष्टी
आहे पाऊस महान......॥२॥

किती मनात आनंद
येतो तनाला शहारा
मोर नाचती सुखाने
सारा पाण्याचा पहारा....॥३॥

शालू पांघरे हिरवा
नववधू जशी नटे
धरा भिजे ओलिचिंब
प्रेम ओतप्रोत दाटे........॥४॥

शेतकरी झाला खूश
पिके येतील जोमाने
ओलेचिंब झाले रान
लागू कामाला जोशाने....॥५॥