***फणसाच्या बियांची चटणी***
साहित्य -
चटणीसाठी -
फणसाच्या १५ - २०
बिया
४ हिरव्या
मिरच्या
एक कप ओल्या नारळाचा किस
१० - १२ लसूण पाकळ्या
एक कप पाणी
कोथिंबीर
चवीपुरता मीठ
एक कप ओल्या नारळाचा किस
१० - १२ लसूण पाकळ्या
एक कप पाणी
कोथिंबीर
चवीपुरता मीठ
फोडणीसाठी -
१ मोठा चमचा तेल
एक छोटा चमचा मोहरी
एक छोटा चमचा जिरे
१० - १२ कढीपत्त्याची पाने
कृती -
प्रथम प्रेशर कुकरमध्ये मिठाच्या पाण्यात बिया उकडून घ्याव्यात. त्यानंतर सर्व बियांची वरची साल काढून घ्यावी.
साल काढलेल्या बिया, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, ओल्या नारळाचा कीस, मीठ हे सर्व मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे. या जाडसर चटणीत पाणी घालून चटणी परत एकदा बारीक वाटून घ्यावी.
फोडणीच्या कढईत तेल तापवून घ्यावे. तेल तापले की त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची पाने फोडणीसाठी घालावी. ही तयार झालेली गरम फोडणी चटणीत टाकून फोडणीचा गरम तडका द्यावा.
झाली तयार फणसाच्या गऱ्यांची चटणी.....!
टीप -
दिलेल्या साहित्यात चार माणसांसाठी चटणी तयार होते. ही चटणी पोळी, भाकरी, डोशासोबत खायला चांगली लागते. ज्यांना चटणीत साखर घालायची असेल ते घालू शकतात.
No comments:
Post a Comment