Monday, October 29, 2018

चिंब पावसा ( गझल )

           चिंब पावसा  ( गझल )


 













या मातीची, ही प्रणयआग विझव जरा तू
चिंब पावसा, भुईला तृप्त भिजव जरा तू


ना मायबाप, नाही वाली, अनाथ पोरे
चिमुकल्या धुंद ताऱ्यांस आज हसव जरा तू


अंधाऱ्या या, बंदिवासात अडकलो असा
खिडकीत रोज चांदणे रम्य सजव जरा तू


आई-बाबा, पोरांमधले वाढे अंतर
वाढती दरी, नात्यांमधली मिटव जरा तू


लावून टिळा तुझ्या कपाळी या मातीचा
गोरे-गोरे, हात गं 'उमा' मळव जरा तू


No comments:

Post a Comment