Wednesday, February 26, 2020

गौरव मराठीचा... मराठी कविता... Marathi poem...





माझ्या मराठी भाषेचा

आहे मला अभिमान
चला गाऊयात सारे
मराठीचे गुणगान... <१>

चौदाखडी पाटीवर
कौतुकाने लिहूयात
गोड आपल्या वाणीने
मराठीत बोलूयात... <२>

परकीय शब्दसुद्धा
उरी सामावून घेते
तिच्यातले प्रेम सारे
पूर्ण जगताला देते... <३>

वृत्ते, कविता, गझल
मराठीचे अलंकार
मात्रा, उकार, वेलांटी
हाच भाषेचा श्रृंगार... <४>

मराठीचा हा गोडवा
सदा अमर रहावा
गोड भाषेचा सन्मान 
सर्व लोकांनी करावा... <५>

अशी मधाळ मराठी
शोभे कशी राजभाषा
सदा रहावी, टिकावी
एवढीच एक आशा... <६> 

मरेपर्यंत... मराठी कविता... Till death... Marathi Kavita... Marathi Poem...




काय करावे हे अनेकांना कळते
पण काय करू नये हे सांगणारे
कोणीच नसतं...

त्यावेळी आतल्या आत घुसमटत जातो माणूस...
लपवून घेतो स्वतःला एकांताच्या कोनाड्यात...

चालतो राहतो वाट संपेपर्यंत...
जगत राहतो मरेपर्यंत...