Tuesday, July 2, 2019

सखा पांडुरंग... Pandurang.. vitthal.. abhang.. Marathi Kavita.. Poem.. मराठी कविता अभंग



विठू नामातले । कसे वर्णू सुख ।
विसरले दुःख । जगताचे... ॥१॥

सदैव पाठीशी । तू विठू माऊली ।
राहू दे सावली । भक्तांवरी... ॥२॥

आषाढी, कार्तिकी । वारी चालू नित्य ।
नाम एक सत्य । माऊलीचे... ॥३॥

विठ्ठल विठ्ठल । वारकरी दंग ।
एक झाला रंग । वैष्णवांचा... ॥४॥

टाळ मृदुंगाला । माऊलीची जोड ।
त्याला नाही तोड । अखंडीत... ॥५॥

सखा पांडुरंग । प्रचंड ती शक्ती ।
सदा करू भक्ती । सावळ्याची... ॥६॥

'उमा'वर ठेव । नित्य कृपादृष्टी ।
आनंदाने सृष्टी । बहरावी... ॥७॥

No comments:

Post a Comment