Tuesday, July 9, 2019
Tuesday, July 2, 2019
जाणीव... चारोळ्या... charoli... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...
सोबत काही नसतांनासुद्धा
तुझ्या प्रेमाची होती जाणीव
सुखाचा संसार झाला आपला
भासली नाही कशाचीच उणीव
सखा पांडुरंग... Pandurang.. vitthal.. abhang.. Marathi Kavita.. Poem.. मराठी कविता अभंग
विठू नामातले । कसे वर्णू सुख ।
विसरले दुःख । जगताचे... ॥१॥
सदैव पाठीशी । तू विठू माऊली ।
राहू दे सावली । भक्तांवरी... ॥२॥
आषाढी, कार्तिकी । वारी चालू नित्य ।
नाम एक सत्य । माऊलीचे... ॥३॥
विठ्ठल विठ्ठल । वारकरी दंग ।
एक झाला रंग । वैष्णवांचा... ॥४॥
टाळ मृदुंगाला । माऊलीची जोड ।
त्याला नाही तोड । अखंडीत... ॥५॥
सखा पांडुरंग । प्रचंड ती शक्ती ।
सदा करू भक्ती । सावळ्याची... ॥६॥
'उमा'वर ठेव । नित्य कृपादृष्टी ।
आनंदाने सृष्टी । बहरावी... ॥७॥
Subscribe to:
Posts (Atom)